YouTube Video पाहून घरात छापत होते नकली नोटा, 2 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – घरात नकली नोटा छापणाऱ्या 2 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे Youtube वरून माहिती घेऊन घरात नकली नोटा छापत होते. यानंतर नागपूर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या दोघांनी दोन लाखांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. तुम्ही जर यूट्यूबवर how to print currency notes अशा प्रकारे सर्च केले तर तुम्हाला अनेक video दिसतील. यानंतर या व्हिडिओच्या मदतीने नागपुरातल्या एका टोळक्याने खोट्या नोटा छापायचा उद्योग सुरू केला.

यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून त्यांचा अवैध उद्योग बंद केला आहे. नागपूर पोलिसांनी नकली नोटा छापण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक केली आहे. या दोघांपैकी एक निलेश कदबेने या अगोदरदेखील अनेक गुन्हे केले आहेत. तर दुसऱ्या आरोपीचे नाव मारूफ खान उर्फ रफीक खान आहे. या दोघांनी आतापर्यंत दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. हे दोघेजण यूट्यूबवरून नकली नोटा बनवण्यास शिकले आहेत. पोलिसांना यांची माहिती गुप्तपणे मिळाली होती.

यानंतर पोलिसांनी कारवाई करत एकता नगरातील निलेश कदबे याच्या घरी छापा टाकला तेव्हा पोलिसांनी एक कॉम्प्युटर दोन प्रिंटर आणि शंभर रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. निलेश या नकली नोटांचा वापर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी करत होता. या नोटांच्या मदतीने निलेशने दारू, जेवण आणि इलेक्ट्रॉनिक सामानाची खरेदी केली होती. जास्त किमतीच्या नोटा छापण्यामध्ये धोका अधिक असल्याने या दोघांनी शंभर-शंभर रुपयांच्या आणि पन्नास रुपयांच्या नकली नोटा छापल्या होत्या. यानंतर नागपूर पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.