2024 लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? धक्कादायक सर्वे समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha 2024) साठी देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधात एकवटले असून त्यांनी INDIA या नावाची महाआघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात प्रथमच विरोधकांची INDIA आणि भाजपप्रणीत NDA यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सर्व विरोधक एकत्र आल्यास मोदींच्या सत्तेला सुरुंग लागणार का? की देशातील जनतेच्या मनावर राज्य केलेले मोदी पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. याच दरम्यान, इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचे समोर येत आहे. परंतु २०२४ निवडणुकीत विरोधकांचे बळ तिपटीने वाढणार असेही दिसत आहे.

इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेनुसार, अनेक ठिकाणी एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढत होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA ला मागच्या निवडणुकीपेक्षा तिप्पट यश मिळू शकते, परंतु तरीही भाजपची सत्ता आणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लोकसभेच्या 543 जागांपैकी INDIA आगाडीला आघाडीला 175 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे NDA ला ३१८ जागांवर स्पष्ट बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होतील.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना फायदा –

इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेनुसार, महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरी होऊनही उद्धव ठाकरेंना २०२४ लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरेंकडे ६ खासदार आहेत तर एकनाथ शिंदेंकडे १३ खासदार आहेत. परंतु २०२४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे ११ खासदार निवडून येऊ शकतात, म्हणजेच त्यांच्या खासदारांचा आकडा ५ ने वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या खासदारांची संख्या १३ वरून फक्त २ वर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, म्हणजेच एकनाथ शिंदेंना मोठा फटका बसू शकतो.

चला जाणून घेऊया कोणत्या पक्षाला किती जागा-

भाजप- 290
काँग्रेस – 66
AAP-१०
TMC-29
बीजेडी-१३
शिवसेना शिंदे – 02
शिवसेना उद्धव ठाकरे – 11
एसपी- ०४
आजेडी- ०७
जेडीयू- ०७
AIADMK – 08
राष्ट्रवादी – 04
राष्ट्रवादी अजित पवार – 02
YSRC- 18
TDP – 07
डावी आघाडी – 08
BRS- 08
इतर – 30