मुंबई । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईत आता ९९३ करोनाबाधीत रुग्ण झाले आहेत. दुसरीकडे दाखल रुग्णांपैकी आणखी चार रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण ६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
तर देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१ एवढी झाली आहे. मागील २४ तासात ८९६ करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत २०६ जणांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर ५१६ जणांना विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे 'या' तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे 'हा' पॅटर्न
@tinadabikhan या २०१५ च्या यु.पी.एस.सी. टाॅपर राहिल्या आहेत#BhilwaraModel #TinaDabi #Careernama #Career #Job #UPSC https://t.co/d9P8wbbHrx— Careernama (@careernama_com) April 10, 2020
हिंमत असेल तर सोबत या, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना उद्धव ठाकरेंची हाक
कोरोमाविरुद्धच्या युद्धात महाराष्ट्राला तुमची गरज आहे@CMOMaharashtra @rajeshtope11 @OfficeofUT #Careernama #career https://t.co/0JNQ733REt— Careernama (@careernama_com) April 10, 2020
वाधवान कुंटुंबाच्या पाचगणी प्रवासाबाबत रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..@RRPSpeaks @RohitPawarSpeak @RohitPawarOffic #HelloMaharashtra #Mahabaleshwar https://t.co/o7BGs5fmsa
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in