हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना संकट वाढू लागले आहे. काल कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. तर मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार रुग्नांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. आज आणखी 22 रुग्ण वाढले असून बाधितांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे तर सध्या 10 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्यावर्षी मे महिन्यानंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाले. प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविली गेल्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र गेल्या 15 दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात राज्यात सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढू लागली असून मागील पाच दिवसांत नवीन 65 रुग्ण समोर आले आहेत. तर रविवारी एकाच दिवसात कोरोना बाधित दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशात आता मंगळवारच्या अहवालानुसार आणखी 22 रुग्णांची वाढ झाली आहे तर गृह विलगीकरणातील 7 रुग्णांना मुक्त करण्यात आले आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकाऱ्यांनीही मास्क वापराबाबत सूचना केली आहे. परिणामी कोरोना संकटाबाबत जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आरोग्य विभागही उपाययोजना राबवत आहे. आतापर्यंतच्या तीन वर्षांत जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2 लाख 80 हजार 859 नोंद झाली. त्यामधील 6 हजार 730 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या वाढत्या कोरोनाच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.