धक्कादायक! कोरोनाव्हायरसमुळे २३ दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपिन्समध्ये कोरोनाव्हायरसमुळे नुकताच एका २३ दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शुक्रवारी माहिती मिळाली. एफ न्यूजच्या वृत्तानुसार,हे कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंतच्या झालेल्या सर्वात लहान मृत्यूंपैकी एक आहे.फिलिपिन्सच्या मनिलापासून सुमारे ७० किमी दक्षिणेस असलेल्या लिपामध्ये ५ एप्रिल रोजी या नवजात बाळाचा मृत्यू झाला, परंतु गुरुवारपर्यंत या विषाणूच्या तपासणी अहवालाविषयी कोणालाही माहिती नव्हते.

आणखी एका वेळेआधीच जन्मलेल्या चार दिवसांच्या बाळाचा कोरोनाव्हायरस अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आढळले. बुधवारी ब्राझीलमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या दुसर्‍याच दिवशी बोलिव्हियात पाच महिन्यांच्या मुलाचा अतिदक्षता विभागात एक आठवडा घालवल्यानंतर मृत्यू झाला.

फिलिपिन्सच्या आरोग्य विभागाने अद्याप आपल्या दैनिक बुलेटिनमध्ये लिपा बाळाच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. गुरुवारी रात्रीपर्यंत, फिलिपिन्समध्ये कोरोनाव्हायरस-संक्रमित लोकांची संख्या ४,०७६ होती, ज्यामध्ये २०३ लोक मरण पावले आहेत आणि १२४ रुग्ण बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

adf

Leave a Comment