कोरबा : वृत्तसंस्था – आजकाल प्रेमाला कसलेच बंधन उरले नाही. आजकाल लोक प्रेम करताना कोणतेही वय बघत नाही. अशाच प्रकारची घटना कोरबा जिल्ह्यामध्ये घडली आहे. यामध्ये एक 32 वर्षीय विवाहित महिला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोन मुलांची आई असलेली ही महिला अल्पवयीन मुलासोबत पळाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या महिलेला अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हि महिला या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात एवढी मग्न झाली होती कि तिने आपल्या कुटुंबाचा घरातील कोणत्याही व्यक्तींचा विचार केला नाही. आणि विशेष म्हणजे या महिलेचा पती एक सरकारी कर्मचारी आहे. दोन मुलांसह त्यांचा संसार सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
हि घटना छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील माणिकपूरमध्ये घडली आहे. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. हि दोन मुलांची आई त्या अल्पवयीन मुलाच्या इतक्या प्रेमात होती की ती त्याच्यासोबत पळून गेली. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यानंतर या दोघांना जांजगीर येथून ताब्यात घेतले. हि महिला घरातून अचानक गायब झाल्याने तिच्या नातेवाईकांनीही तिला शोधण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करून तिची रवानगी तुरुंगात केली आहे.
या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता जांजगीर जिल्ह्यातील नवागढ येथील अल्पवयीन मुलाच्या मामाच्या घरी दोघेही असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. यानंतर पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पोक्सो कायद्यासह इतर कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील महिलेला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला तुरुंगात पाठविण्यात आले असल्याचे माणिकपूर चौकी प्रभारी अशोक पांडे यांनी सांगितले आहे.