पुणे-बंगळुर महामार्गावर ट्रक-स्विफ्ट कारचा अपघात; चार जण जागीच ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे स्विफ्ट कारला मोठा अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट कराचा चक्काचूर झाला असून अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत.

कराड तालुक्यात वहागाव जवळ सदर अपघात झाला आहे. कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना कारला अपघात झाल्याचे समजत आहे.

दरम्यान, अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

You might also like