हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Benefits Of Mint : आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहाराकडे आणि आरोग्याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. कारण उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने उन्हाळ्यामध्ये शरीराला पोषक आणि थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे ठरेल.
या ऋतूत उष्णतेच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. यासाठी अनेक प्रकारची पेये देखील वापरली जातात. त्यामुळेच उन्हाळ्यात पुदिन्याला मोठी मागणी असते. आपल्या दैनंदिन आयुष्यात पुदिना अनेक प्रकारे वापरला जातो. त्यामुळेच आज पुदिन्याचे फायदे जाणून घेणार आहोत. Benefits Of Mint
खोकला आणि सर्दीपासून आराम
पुदिन्यापासून अनेक प्रकारची पेयेही तयार केली जातात. ही पेय उष्णतेपासून आरामही देतात. चहामध्ये पुदिन्याची पाने टाकल्यास खोकला आणि सर्दीमध्ये खूपच आराम मिळतो. Benefits Of Mint
रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ
लिंबू आणि नारळ पाण्यामध्ये पुदिना मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल तर चांगली राहतेच. मात्र त्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
पचन
WebMD मधील एका बातमीनुसार, पचनासंबंधित समस्यांमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो. तसेच जिरे, काळी मिरी आणि हिंग मिसळून पुदिना खाल्ल्यास यामुळे पोटदुखीही थांबते. Benefits Of Mint
त्वचेचे पोषण
पुदीना आपल्या थंडतेच्या प्रभावामुळे ओळखला जातो. पुदिनाही काकडींप्रमाणेच त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ताजी आणि ओलसर दिसण्यात मदत होते. त्याचप्रमाणे पुदिन्याच्या पानांचा रस दही किंवा मधामध्ये मिसळून लावल्यानेही खूप फायदा होतो.
ऍलर्जीमध्ये फायदेशीर
कोणत्याही ऍलर्जीमध्ये पुदिना खूपच फायदेशीर आहे. विशेषतः नाक आणि डोळ्यांशी संबंधित ऍलर्जीमध्ये ते खूप प्रभावी असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. यामुळे मन शांत राहते आणि तणावही दूर होतो. Benefits Of Mint
हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक