हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला माहित आहे की, हे जग विचित्र गोष्टींनी परिपूर्ण आहे. गूढ जगातील एक विचित्र गोष्ट आता चीनच्या जिआंग्सु प्रांतातही दिसली आहे. येथे 17 वर्षांपासून 5 इंचाचा एक किडा एका 23 वर्षीय युवकाच्या मेंदूला खात होता. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो फक्त 6 वर्षांचा होता तेव्हा त्याचे हात आणि पाय सुन्न पडू लागले. वयानुसार ही समस्या वाढू लागली. जेव्हा त्या व्यक्तीच्या अर्ध्या शरीराचे सेंसेशन कमी झाले संपली, तेव्हा तो डॉक्टरकडे गेला.
पहिल्यांदा, जेव्हा डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिले तेव्हा त्यांनी सांगितले की अर्धवट शिजवलेले किंवा कच्चे मांस खाल्ल्याने त्यांना संसर्ग झाला आहे. त्याच वेळी, त्या माणसाचे आईवडील असे म्हणतात की, लहानपणापासूनच त्याच्या हाता-पायात अडचण होती. बालपणात अशी समस्या आल्यानंतर त्यांना वाटले की ही अनुवांशिक समस्या आहे.
मेंदूमध्ये 5 इंचाचा कीड़ा
तर, जेव्हा डॉक्टरांनी त्या व्यक्तीचे सीटी स्कॅन केले तेव्हा त्यांना समजले की, त्या माणसाच्या मेंदूत एक कीड़ा आहे. अशुद्ध पाणी पिणे किंवा कच्चे मांस खाण्यामुळे असे घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या मते, Sparganosi Mansoni असे या आजाराचे नाव आहे.
किडा मेंदू खात होता!
डॉक्टर म्हणाले की, हा किडा मेंदूत शिरतो आणि त्याच्या कार्यावर परिणाम करतो. मेंदूत कीड सापडल्यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया केली, त्यानंतर किड्याला मेंदूमधून काढून घेण्यात आला. डॉक्टर म्हणतात की, शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीची परिस्थिती आता सुधारत आहे.
त्याच वेळी, चिनी माध्यमांच्या अहवालांनुसार, असे पहिल्यांदाच झाले असेल की, वयाच्या 6 व्या वर्षी लक्षणे दिसल्यानंतर, 17 वर्षांपासून त्या किड्याने जिवंत राहण्याची ही पहिलीच घटना आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.