हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ITR refund : 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आता निघून गेली आहे. आता ज्यांनी ITR भरला आहे त्यांना रिफंड मिळाला असेल किंवा त्याची वाट पाहत असतील. मात्र, ज्यांनी आयटीआर भरलेला नाही ते दंड भरून तो दाखल करू शकतात. मात्र यातून रिफंडचा लाभ दिला जाणार नाही. आज आपण ITR refund शी संबंधित 5 महत्त्वाच्या नियमांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत…
पात्रता – 31 जुलै किंवा त्याआधी आयटीआर भरलेली लोकंच टॅक्स रिफंड (ITR refund) मिळवण्यासाठी पात्र असतील.
ITR रिफंडवरील व्याज – जर 31 जुलै पर्यंत ITR भरला असेल तरच 1 एप्रिल 2022 पासून रिफंडवर (ITR refund) व्याज मिळेल. जर शेवटच्या तारखेनंतर आयटीआर भरला असेल तर हा लाभ मिळणार नाही.
किती व्याज मिळेल ??? – शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर फाइल करणाऱ्या करदात्यांना रिफंडच्या रकमेवर मासिक 0.50 टक्के व्याज मिळेल.
रिफंडबाबत टॅक्सचा नियम – आयकरदात्याकडून ITR refund बाबत सरकारला आधीच माहिती दिलेली असते. त्यामुळे रिफंडच्या रकमेवर टॅक्स भरला जात नाही. मात्र रिफंडवर मिळणारे व्याज आयकरदात्यावर लागू असलेल्या टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असेल.
व्याजाचे कॅल्क्युलेशन – ITR refund वरील व्याज मोजताना 100 रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रत्येक रकमेकडे दुर्लक्ष केले जाते, तर महिन्यातील दिवसांची संख्या संपूर्ण महिना मानली जाते. उदाहरणार्थ 3 महिने 10 नाही तर 4 महिन्यांचे व्याज मिळेल. त्याचबरोबर 4885 नाही तर 4800 रुपयांवर व्याज दिले जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html
हे पण वाचा :
Multibagger Stock : या 5 शेअर्सनी एका वर्षात दिला चार पट रिटर्न !!!
Sukanya samriddhi yojana च्या व्याजाशी संबंधित ‘हा’ नियम जाणून घ्या !!!
Indian Railway कडून 120 गाड्या रद्द , अशा प्रकारे चेक करा लिस्ट !!!
महागाईचा झटका !! CNG आणि PNG दरात मोठी वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा