धक्कादायक ! ६० वर्षीय नराधमाने १० वर्षीय मुलीसोबत केले अश्लील चाळे

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धौलपूर : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षितेतचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. हि घटना धौलपूर जिल्ह्यातील कांचनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये एका ६० वर्षीय आरोपीला हा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अवघ्या ६ तासांत रूपवास रेल्वे स्टेशन भरतपूरहून अटक केली आहे.

रेल्वे स्थानकातून अटक
धौलपूरचे एसपी केसरसिंग शेखावत यांनी महिलांच्या गुन्ह्यांबाबत अत्यंत कठोर पावले उचलत या गुन्ह्यात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पोलिसाने अनार सिंह नावाच्या ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याला भरतपूरमधील रूपवास या रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा विनयभंग करण्यात आला आहे. पीडित मुलीने या संबंधीत तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती कांचनपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्रकुमार शर्मा यांनी दिली आहे.

मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत आरोपीला केली अटक
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आणि तांत्रिक बाबींच्या मदतीने अवघ्या ६ तासात आरोपीला शोधून त्याला अटक केली आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुलगी जवळील दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली असताना ६० वर्षांच्या आरोपीने मुलीला रस्त्यामध्ये तिला रोखले. यानंतर त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले, जेव्हा ती मुलगी रडत घरी पोहोचली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण कुटुंबीयांना समजले. यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.