हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फसवणुकीची शेकडो प्रकरणे तुम्ही ऐकली असतीलच. कधी बँक ग्राहकांची फसवणूक करते तर कधी ग्राहकच बँकेची फसवणूक करून पळून जातात. परंतु हे नवीन प्रकरण खूपच रंजक आहे. कारण यात फसवणूक ही खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) च्या बाबतीत झाली आहे. ही फसवणूक करणारा कोणीही दुसरा कोणीही, तर त्यांची स्वत: ची बँक शाखाच आहे. लखनौमधील RBI च्या एका शाखेत बनावट नोटा जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. या नोटा 500 आणि 1000 हजारांच्या आहेत. हे प्रकरण आता पोलिस ठाण्यात गेले आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबला देखील तपासणीसाठी पत्र लिहिले गेले आहे. RBI च्या सहाय्यक व्यवस्थापक रंजना मरावी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात अर्ज केला आहे.
अशाप्रकारे RBI बरोबर फसवणूक केली गेली
तज्ज्ञांच्या मते लखनौ महानगरातील RBI च्या करन्सी चेस्टमध्ये फसवणूक झाली आहे. यावेळी बँकेत 500 रुपयांच्या 9753 नोटा तर 1000 च्या 5783 बनावट नोटा सापडल्या आहेत. हे तपासात उघडकीस आले आहे. या नोटांची एकूण किंमत दीड कोटी रुपये असल्याचेही चौकशीत उघड झाले असून या सर्व नोटा 2017 आणि 2018 मध्ये वेगवेगळ्या बँकांकडून आल्या. येणारे चलन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तपासणीला देखील वेळ लागतो आहे. पण हे उघडकीस आल्यानंतर अधिकाऱ्यांची झोपच उडाली. आता या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी केली जात आहे. तसेच, आता पोलिसही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
पोलिसही नोटांची फॉरेन्सिक तपासणी करणार आहेत
तज्ज्ञांच्या मते, तक्रार येताच पोलिसांनी नोटांची फॉरेन्सिक तपासणी करण्याचेही ठरविले आहे. यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅब अधिकाऱ्यांना पत्रही लिहिले आहे. आता लवकरच FSL चे अधिकारी नोटा तपासण्यासाठी RBI शाखेतही येऊ शकतात. ही बाब आणखी मोठी असू शकते असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.