व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसचे 8 आमदार फुटले; भाजपमध्ये केला प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रा काढत असतानाच दुसरीकडे गोव्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार फुटले असून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दिगंबर कामत, मायकेल लोबो, डेलीला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांच्यासह 8 काँग्रेस आमदार आज भाजपमध्ये सामील झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही त्यांनी भेट घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली चालू होत्या . जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु आता आठ आमदार एकत्र आले असून यापैकी काही आमदारांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.