बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बुलडाणा शहरानजीक येळगाव जवळ असलेल्या आदिवासी आश्रम शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने एका 7 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा (tribal students death) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
रोशन रमेश दुबे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही आदिवासी आश्रम शाळा ही माजी आमदार तथा भाजपाचे नेते विजयराज शिंदे यांची आहे. आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी रोशन रमेश दुबे हा शाळा सुटल्यानंतर आपल्या मित्रांना सोबत घेवून आश्रम शाळेच्या आवारातील शाळेच्या गेटसमोर खेळत असताना अचानक लोखंडी गेट हा रोशनच्या अंगावर (tribal students death) पडला.
यावेळी रोशनच्या डोक्याला (tribal students death) गंभीर दुखापत झाली. सोबत असलेल्या मित्रांनी तातडीने याची माहिती आश्रम शाळेचे अधीक्षक अंकुश जाधव आणि राजेश राठोड यांना दिली. यानंतर त्यांनी जखमी रोशनला उपचाराकरीता बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी रोशनला मृत (tribal students death) घोषित केले. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार