नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांधी कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनचा (Rajiv Gandhi Foundation) परदेशातून फंड घेण्याचा निधी परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हि संस्था गांधी घराण्याशी (Rajiv Gandhi Foundation) संलग्न आहे. परकीय निधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे.
राजीव गांधी फाउंडेशनची (Rajiv Gandhi Foundation) स्थापना 1991 मध्ये करण्यात आली होती. सध्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत.1991 ते 2009 पर्यंत, ‘आरजीएफ’ने आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, अपंग सहाय्य यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर काम केले आहे. 2010 मध्ये, फाऊंडेशनने शिक्षणाशी संबंधित विषयांवरही काम करण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर 2020 मध्ये गृह मंत्रालयाने अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रालय अंतर्गत समिती स्थापन केली होती. या समितीकडे गांधी कुटुंबातील राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीन संस्थांची चौकशी करण्याचे काम देण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर आयकर कायदा आणि ‘एफसीआरए’चे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर या समितीच्या तपास अहवालानंतर केंद्र सरकारने राजीव गांधी फाउंडेशनचा (Rajiv Gandhi Foundation) परवाना रद्द केला.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती