हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाणे येथील मनसेच्या उत्तर सभेत तलवार दाखवली होती. या कारणांमुळे आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाली असल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे येथे काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या उत्तर’च्या सभेपूर्वी राज ठाकरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ देण्यात आले. या दरम्यान एका कार्यकर्त्याने त्यांना एक तलवारही दिली.
ती तलवार त्यांनी भर जाहीर सभेत म्यानातून बाहेर काढून दाखवली. या कारणामुळे भर सभेत तलवार दाखवल्याचे कारण सांगत राज ठाकरे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/708934226905854
दरम्यान, राज ठाकरे यांच्या विरोधात नौपाडा पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. यावेळी धुमाळ म्हणाले की, ‘ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत काल 12 एप्रिल रोजी गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेदरम्यान तलवार दाखवली.
या प्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि कलम 34 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 आणि 25 अन्वये अध्यक्ष मनसे राज ठाकरे, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’असे धुमाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.