व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई पोलिसांसाठी बनवले भन्नाट गाणं; देवेंद्र फडणवीसांनी केले शेअर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. भक्तिभावाने आणि उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी आरती आणि भजनांचा आवाज घुमू लागला. अशातच मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्येही (Mumbai Police) बाप्पाचे आगमन झाले. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘पोलीस बाप्पाचे’ स्वागत केले.

‘पोलीस बाप्पा’ आणण्यामागचा हेतू लोकांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल (Mumbai Police) जागरूकता पसरवणे हा आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुन्हेगारी, वाहतूक नियम आणि विशेषत: सायबर फसवणुकीबाबत माहिती नसलेल्या लोकांना जागरुक करण्यात येत आहे. यासाठी पोलीस ठाण्याचे (Mumbai Police) इन्स्पेक्टर राजेंद्र काणे यांनी गणपती बाप्पासाठी स्वतः एक गाणे तयार केले असून या गाण्याचे शीर्षक ‘पोलीस बाप्पा’ असे आहे.

सायबर गुन्हे आणि फसवणुकीबाबत लोकांना जागृत करणारे गाणे मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडीओ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. नागरिकांनी वेळीच सावध व्हावे आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे कसे रक्षण करावे यासंबंधी माहिती या गाण्यातून देण्यात आली आहे. हे गाणे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि गायक अवधूत गुप्ते यांनी गायले आहे. या गाण्यात अभिनेता पुष्कर श्रोत्री, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, चिन्मयी सुर्वे, जयवंत वाडकर, माधव देवचके आणि हृषिकेश जोशी यांनी अभिनय साकारला आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर