व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्याचा जुगाड अन् बनवला CNG वर चालणारा ट्रॅक्टर; भन्नाट Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज कित्येक नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओंना नेटकऱ्यांचा तितकाच प्रतिसाद मिळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये, एका शेतकऱ्याने थेट सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टरच बनवण्याचे दिसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींना कंटाळून त्याने बनवलेला हा सीएनजी ट्रॅक्टर चांगलाच चर्चेत आला आहे. आता या CNG ट्रॅक्टरला पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरी लोकांच्या रांगा लागू लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक शेतकरी त्याच्या ट्रॅक्टरवर बसलेला आहे. तर दुसरा एक व्यक्ती याच ट्रॅक्टरची माहिती देताना दिसत आहे. तो सांगत आहे की हा ट्रॅक्टर पेट्रोल डिझेलवर चालणारा नाही. किंवा तो हवेत उडणारा देखील नाहीये. तर हा ट्रॅक्टर सीएनजी ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरला दोन्ही बाजूंनी सीएनजीच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. सीएनजी गॅसच्या वायर ट्रॅक्टरच्या आतमध्ये जोडल्या गेल्या आहेत. ज्यामुळे हा ट्रॅक्टर थेट सीएनजीवर चालतो. ज्यामुळे शेतकऱ्याला पेट्रोल, डिझेलसाठी पैसे खर्च करावे लागत नाही.

हा व्हिडिओ ट्विटरवर @IndianFarmer_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की, “हा ट्रॅक्टर पेट्रोल किंवा डिझेलवरती चालत नाही, शेतकऱ्याचा जुगाड पाहून अनेकांना धक्का बसेल” 52 मिनिटाच्या या व्हिडिओला ट्विटरवर लाखोंच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या सीएनजी ट्रॅक्टरला पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच, शेतकऱ्याच्या या भन्नाट कल्पनेला सलाम ठोकला आहे.

दरम्यान सीएनजी ट्रॅक्टर पटलावडा येथील एमपीचे शेतकरी देवेंद्र परमार यांनी बनवला आहे. सध्या त्यांच्या या ट्रॅक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी बनवलेल्या या भन्नाट कल्पनेला आज लोकांकडून चांगला प्रतिसाद देण्यात येत आहे. तसेच अनेकांनी देवेंद्र यांना सीएनजी टॅक्टर बनवण्याची प्रक्रिया देखील विचारले आहे. सध्याच्या महागाईच्या काळात हा सीएनजी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी अति फायदेशीर ठरू शकतो.