खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून दलित घटकांच्या विकासासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर

Shriniwas Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी १ कोटी ६३ लक्ष रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंदिस्त गटर बांधणे, अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, समाज मंदिर बांधणे अशी कामे मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजने अंर्तगत सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या १८ विकास कामांच्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये सातारा जिल्ह्यातील आरे तर्फ परळी येथे शाक्य नगरमध्ये समाजमंदिर बांधणे ७ लाख, शिवथर येथे बौद्धवस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, जावली तालुक्यातील सायगाव येथे सारनाथ नगरमध्ये अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे व बंदिस्त गटर बांधणे १० लाख, बिभवी येथे बौद्धवस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, पाटण तालुक्यातील ठोमसे येथे बौद्धवस्तीत आरसीसी गटर व कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, चाफळ येथे मातंग वस्तीत आरसीसी गटर बांधणे १० लाख, पापर्डे येथे बौद्ध वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, कराड तालुक्यातील किरपे येथे बौद्धवस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, किरपे येथे बौद्धवस्तीत बंदिस्त गटर बांधणे १० लाख, सैदापूर येथे अंबक वस्तीत बंदिस्त गटर व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, निधीचा समावेश आहे.

तसेच सैदापूर येथे स्वप्नीलनगर मागासवर्गीय वस्तीत बंदिस्त गटर व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ८ लाख, सैदापूर येथे नवे व जुने बेघर वस्तीत बंदिस्त गटर व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, सैदापूर येथे भिमनगर मध्ये बंदिस्त गटर व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ९.१८ लाख, बेलवडे बुद्रुक येथे बंदिस्त आरसीसी गटर करणे १० लाख, बेलवडे बुद्रुक येथे मातंगवस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ३.९५ लाख, संजयनगर शेरे येथे बौद्धवस्तीत आरसीसी गटर व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, साजूर येथे समतानगर मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख,  केसे येथे जुने गावठाण बौद्धवस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख असा निधी मंजूर झाला आहे.