पोटातल्या बाळासह पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याने मानसिक धक्क्यातून पतीने उचलले ‘हे’ पाऊल

husband killed himself
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू जिव्हारी लागल्याने पतीनेदेखील मानसिक धक्क्यातून विषारी औषध घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (husband killed himself) केला आहे. हि धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी या ठिकाणी घडली आहे. रमेश नवनाथ कानसकर असे आत्महत्या (husband killed himself) केलेल्या पतीचे नाव आहे. आठ महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या संसाराचा आज करुण अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आठ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
विद्या आणि रमेश यांचा आठ महिन्यांपूर्वीच जुन्नर येथे विवाह झाला होता. यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची डॉक्टरकडे तपासणी सुरू होती.

गर्भवती पत्नीला चेकअपसाठी रुग्णालयात नेताना अपघात
14 नोव्हेंबरला रमेश आपली पत्नी आणि सासूला दुचाकीवरून घेऊन डॉक्टरांकडे तपासणी करून घरी जात होता. यादरम्यान वारुळवाडी येथे येताच ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला लागला. यामुळे विद्या खाली पडली तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीच्या मृत्यूनंतर रमेश मानसिक तणावात
पत्नीच्या मृत्यूनंतर रमेश तणावाखाली होता. तसेच त्याने मागच्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाणी देखील सोडले होते. यानंतर अखेर त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध पिऊन आपल्या आयुष्याचा (husband killed himself) शेवट केला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती