हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार? याची चांगलीच चर्चा रंगली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाबाबत शिक्कामोर्तब झाले असून हा निर्णय सर्वस्वी निवड समिती घेणार आहे. याबाबत 5 मे ला निवड समितीची बैठक होणार असून यावेळी राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरणार आहे.
मुंबईत काल शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर करत सर्वानाच मोठा धक्का दिला. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून पक्षातील जेष्ठ नेत्यांकडून वारंवार विनंती देखील करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना तर अक्षरशः अश्रू अनावर झाले. नेते आणि कार्यकर्त्यांनी मनधरणी करूनही पवार आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत. नवीन अध्यक्ष निवडण्याबाबत बैठक घेऊन 6 मे ची बैठक 5 मे ला घ्या असे निर्देश खुद्द शरद पवार यांनी दिले आहेत. तर समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असल्याचे पवार यांनी म्हंटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी ‘ही’ 2 नावे चर्चेत Click
5 मे रोजी घेण्यात येणाऱ्या बैठकीसाठीची पूर्वतयारी म्हणून आज सायंकाळी 7 वाजता पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक आयोजित केली आहे. यामध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल. या बैठकीत 5 तारखेच्या बैठकीची दिशा स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.