साताऱ्यातील दिव्यांग बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवली 1 रुपयांची मनी ऑर्डर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नुकतेच आर्थिक बजेट मांडण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांसाही केलेल्या तरतुदीवरून आज सातारा जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या दिव्यांग बांधवांनी निषेध आंदोलन केले. यावेळी दिव्यांगांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक रुपयांची पोस्टाने रजिस्टर मनी ऑर्डर ही पाठवण्यात आली.

सातारा येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात व बजेटच्या निषेधार्त प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व दिव्यांग बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण मांडलेल्या बजेटमध्ये दिव्यांगांच्या हितासाठी तरतूद काय केली? असा सवाल विचारला.

यावेळी संघटनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कारंडे म्हणाले की, प्रत्येकवेळी निवडणूक आली की, मतदान असलं की राजकीय नंतर मंडळींना दिव्यांग बांधवांची आठवण येते. मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी गाडी पाठवली जाते. पण आताच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या हक्कांसाठी उपमुख्यमंत्री पवारांनी नेमकी काय तरतूद केली? किमान सुधारित अर्थसंकल्पात तरी दिव्यांगांसाठी भरघोस तरतूद करावी, अशी मागणी कारंडे यांनी केली.

Leave a Comment