Wednesday, October 5, 2022

Buy now

बॉम्ब कुठेय म्हणत हातवारे अन् मग दंडही थोपटले; धनंजय मुंडेंची कृती कॅमेरात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील पाटबंधारे खात्याबाबत माहिती देत असताना दुसरीकडे त्यांच्या पाठीमागेच बसलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या कृतीने कॅमेराचे लक्ष वेधून घेतले. बॉम्ब कुठेय? असा प्रश्न विरोधकांना करत त्यांनी चक्क हातवारे करत दंडही थोपटले.

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्ब मुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आज फडणवीस पुन्हा नवा बॉम्ब फोडतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर आज धनंजय मुंडे विरोधकांकडे पाहत बॉम्ब कुठेय अशी खुनवा खुनवी केली. यावेळी ते गोल गोल हात फिरवत बॉम्ब, हात वर करुन स्फोट असे हावभाव करुन संवाद साधताना दिसताय तसेच यावेळी त्यांनी दंड थोपटून इशाराही दिला.

धनंजय मुंडे यांचा विधानसभेतला हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. सत्ताधारी पक्षदेखील फडणवीसांच्या पुढच्या बॉम्बची किती आतुरतेने वाट पहात आहेत, हेच यातून स्पष्ट होतंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.