हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधून एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे.जिथे एका व्यक्तीने किराणा सामानाची डिलिव्हरी एका मुसलमान डिलिव्हरी बॉयकडून घेण्यास नकार दिला आहे.ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा भागात सामानाची डिलिव्हरी करायला गेलेल्या एका एका मुसलमान डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी घेण्यास नकार दिला म्हणून ५१ वर्षीय गजानंद चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या व्यक्तीने किरणाचे सामान ऑनलाईन ऑर्डर केले होते.
डिलिव्हरी बॉयला त्याचे नाव विचारले
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले कि ५१ वर्षीय गजानंद चतुर्वेदी यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम २९५ A च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले कि,सामानाची डिलिव्हरी करणाऱ्याने फिर्याद केली आहे कि,मंगळवारी सकाळी जेव्हा तो सामानाची डिलिव्हरी करायला चतुर्वेदी यांच्या घरी गेला तेव्हा त्याने त्याचे नाव विचारले.
मसलमान नाव असल्या कारणाने सामान घेण्यास दिला नकार
यादरम्यानच जेव्हा त्याने आपले नाव सांगितले तेव्हा ते म्हणाले कि एका मुसलमान व्यक्तीकडून मी सामान घेणार नाही.यानंतर या डिलिव्हरी बॉय ने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर बुधवारी त्यांना राहत्या घरातून अटक करुन ठाण्याच्या सेशन कोर्टमध्ये हजर करण्यात आले.त्यानंतर १५ हजार रुपये दंड भरून त्यांना जामिनावर सोडण्यात आले.३२ वर्षांचा डिलिव्हरी बॉय उस्मान बरकत परेल मंगळवारी सकाळी ९:४० मिनिटांनी मीरा रोड येथील सृष्टी कॉम्प्लेक्स येथे सामानाची डिलिव्हरी करायला गेले होते.
युवकाने या घटनाक्रमाचा बनवला व्हिडीओ
यादरम्यान त्यांनी मास्क आणि ग्लोव्ह्ज हि घातले होते.जेव्हा चतुर्वेदी आणि त्यांच्या पत्नीला त्याचे नाव कळले तेव्हा त्यांनी त्याच्याकडून सामान घेण्यास नकार दिला. उस्मान ने मोबाईल काढून या सगळ्या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे सुरु केले.यादरम्यान गजानंद यांनी सांगितले कि ते एका मुसलमान व्यक्ती कडून सामानाची डिलिव्हरी नाही घेऊ शकत.यानंतर उस्मानने बराच वेळा सांगूनही त्यांनी सामान घेण्यास असहमती दर्शवली.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.