आता लग्नापूर्वी करावी लागणार पोलीस पडताळणी? गृहमंत्र्यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. देशातील अनेक राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये वाढही होताना दिसत आहे. अशी प्रकरणे रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांची मोठे विधान केले आहे. इतर धर्मातील विवाहावर पडताळणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी नोटरी आणि विवाह नोंदणी संस्थांसाठी न्यायालय नियम बनवणार असून यामध्ये लग्नापूर्वी पोलीस व्हेरिफिकेशनची व्यवस्था असणार आहे, त्यामुळे लग्नापूर्वी पोलीस पडताळणी करणे आवश्यक असणार असल्याचे गृहमंत्री मिश्रा यांनी म्हंटले आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चार इमली येथे एका कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी पुढाकार घेणार आहे. ज्यामध्ये इतर धर्मातील विवाहावर पडताळणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी नोटरी आणि विवाह नोंदणी संस्थांसाठी न्यायालय नियम बनवणार आहे. यामध्ये लग्नापूर्वी पोलीस व्हेरिफिकेशनची व्यवस्था असणारा असून नाव बदलून बनावट कागदपत्रांसह होणाऱ्या विवाहांवर लक्ष ठेवले जाईल.

मध्य प्रदेशात लव्ह जिहाद प्रकरणाच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसत आहेत. हि प्रकरणे कमी करता यावी म्हणून गृहमंत्री मिश्रा यांनी आता पुढाकार घेतला आहे. दरम्यान, मिश्रा यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मिश्रांच्या वक्तव्याची अंमलबजावणी झाल्यास बनावट कागदपत्रांच्या वापर करून इतर मुलींची फसवणूक करणाऱ्यांवरमध्य प्रदेशातील सरकारकडून आता नजर ठेवली जाणार आहे.