देवघरात चक्क शरद पवारांचा फोटो! ‘हे’ पाहून पवारही झाले भावूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । माजी आमदार विलास लांडे यांच्या वडिलांचे ३० जून रोजी निधन झाले. वारकरी आणि पैलवान अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विठोबा लांडे यांना माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी विठोबा लांडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते शरद पवार यांचे सहकारी होत. यावेळी त्यांच्या देवघरात आपला फोटो पाहून शरद पवार भावुक झाले.

विठोबा लांडे पवार यांना देवाच्या जागी मानत होते तसेच नित्यनेमाने देवघरात ठेवलेल्या फोटोची विठोबा लांडे पूजा करायचे हे ऐकून शरद पवार भावुक झाले. विठोबा लांडे यांच्या पत्नीचे महिनाभरापूर्वी निधन झाले होते. यावेळी पवार यांनी फोनवरून त्यांना श्रद्धांजली वाहत विठोबा यांचे सांत्वन केले होते. तसेच भेटायला येणार असल्याचे देखील सांगितले होते. मात्र त्यांची भेट होण्याआधीच विठोबा यांचे निधन झाले त्यांचे वय १०२ वर्षे इतके होते.

विठोबा लांडे हे एकेकाळी पवार यांचे सहकारी होत. म्हणूनच प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. ते आपल्यात राहिले नाहीत तसेच आपली त्यांच्याशी शेवटची भेट होऊ शकली नाही यावर पवार यांनी हळहळ व्यक्त केली. देवघरातला आपला फोटो पाहून ते स्वतःला आवृ शकले नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.