आता घरबसल्या बदला आपल्या आधार कार्डवरील पत्ता, पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे अनेक लोकांना त्यांचे शहर बदलण्यास भाग पडले आहे. अशा परिस्थितीत कोट्यावधी लोकांना शासकीय कामांसाठी असलेल्या पत्त्याबाबत मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी यूआयडीएआयने आधारमध्ये आपला घराचा पत्ता बदलण्याशी संबंधित एक नवीन सेवा घोषित केली आहे. या सेवेमध्ये आपण सहजपणे आपल्या घरातूनच पत्ता बदलू शकता. यूआयडीएआयने यासंबंधित एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये घराचा पत्ता बदलण्याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ पाहून आपण आता सहजपणे आपला घराचा पत्ता आधार कार्डमध्ये बदलू शकता.

यूआयडीएआयने ट्विटरवर ट्वीट केले आहे की, यासाठी आपल्याला सर्वप्रथम युआयडीएआय https://uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला ‘Online Address Update’ वर क्लिक करावे लागेल.

येथे आपल्याला आपल्या सध्याच्या घराचा योग्य पत्ता भरावा लागेल. यासह, सहायक डॉक्यूमेंटची कलर्ड स्कॅन फाइल अपलोड करावी लागेल.

ती अपलोड केल्यानंतर आपला नवीन पत्ता अपडेट केला जाईल. या प्रक्रियेद्वारे, आता आपल्याला लांबलचक रांगेत उभे रहाण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. आपला पत्ता हा अवघ्या काही क्लिकमध्ये अपडेट केला जाईल.

https://youtu.be/T2JSCD3TtuU

आधारमध्ये पत्ता बदलण्याविषयीची ही संपूर्ण माहिती

>> सर्वप्रथम यूआयडीएआयची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. येथे आपल्याला My Adhaar नावाचा एक टॅब सापडेल. ड्रॉपडाउनमधील दुसर्‍या टॅबवर Udate Your Aadhaar मध्ये जाऊन तिसर्‍या पर्याय Update your address online वर क्लिक करा.

>> त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पेज उघडेल. आपण येथे खाली जाताना, Proceed to Update Address वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल.

>> या पेज वरील पहिले आपला आधार क्रमांक, कॅप्चा व्हेरीफिकेशन भर आणि खाली Send OTP वर क्लिक करा. आता आपल्या आधार रजिस्टर्ड क्रमांकावर एक OTP येईल.

>> तो OTP भरा. त्यात प्रवेश केल्यावर तुम्हाला Data Update Request वर क्लिक करावा लागेल. त्यानंतर अ‍ॅड्रेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पत्ता बदलला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment