Gujarat Election 2022 : AAP च्या एन्ट्रीने कोणाचे नुकसान?? भाजप की काँग्रेसचे?

0
224
Aam Aadmi Party BJP Congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. हि निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस असा दुरंगी सामना अनेक वर्षांपासून होत असला तरी यंदा मात्र या निवडणुकीत आपने एन्ट्री केली आहे. त्यामुळे या ठिकाणी आम आदमी पार्टीमुळे तिरंगी लढती होणार असल्याने यामुळे कोणाचे नुकसान होणारे हे पहावे लागणार आहे.

या निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ताकदीनिशी उतरली असून तिचा विजय झाल्यास तसेच गुजरातची सत्ता गमाविल्यास भाजपच्या राष्ट्रीय राजकारणावरच परिणाम होऊ शकतो. यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी स्वत: गुजरातच्या निवडणुकीच्या तयारीत लक्ष घातले. गेल्या सहा महिन्यांत 15 वेळा त्यांनी गुजरातला भेट दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन दिवस त्यांनी गुजरातचा दौरा केला आहे.

गुजरातमधील यापूर्वी झालेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी पहिली तर पाच वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला अगदी निसटते बहुमत मिळाले होते. काँग्रेसने अक्षरश: भाजपचा घाम काढला होता. गेल्या निवडणुकीप्रमाणे काँग्रेसचा तेवढा दबदबा राहिलेला नसला तरी ही जागा भरून काढण्यासाठी आम आदमी पार्टीने चांगलाच जोर लावला आहे.

गुजरातमध्ये भाजपचा पराभव करण्यात केजरीवाल यांना यश आले तर त्याचा मोठा फटका 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बसू शकतो. केजरीवाल यांनी लोकांना मोफत वीज, दवाखान्यात मोफत उपचार तसेच खाजगी शाळांचे ऑडिट, स्विस बँकेतील काळे धन परत आणणार अशी वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीत आपची एन्ट्री हि नक्की कोणासाठी डोकेदुखी ठरणार भाजपसाठी कि काँग्रेससाठी हे पहावे लागणार आहे.