नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) भाजपला जोरदार धक्का देत मोठा विजय संपादन केला आहे. मागच्या 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती. या विजयानंतर आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) कार्यकर्त्यांनी दिल्लीचे भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी गायलेल्या प्रसिद्ध ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत जल्लोष साजरा केला.
‘आप’चे (Aam Aadmi Party) कार्यकर्ते आणि समर्थकांनी गळ्यात फुलांचा हार आणि डोक्यावर ‘आप’ची टोपी घालून डान्स केला आहे. त्यांच्या पाठीमागे एका मोठ्या स्क्रीनवर भाजपा खासदार मनोज तिवारी यांच्या गाण्याचा व्हिडीओ लावला आहे. त्या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी पडद्यावर गाताना दिसत आहेत, तर ‘आप’चे (Aam Aadmi Party) समर्थक त्या गाण्यावर डान्स करत जल्लोष करताना दिसत आहेत.
हम जीत गए✌️
चट दिहली मार दिहली खीच के तमाचा..हीही हीही हांस दिहली रिंकिया के पापा..#MCDMeinBhiKejriwal pic.twitter.com/F9lxRX9h5N
— Aam Aadmi Party- Uttar Pradesh (@AAPUttarPradesh) December 7, 2022
या डान्सचा व्हिडीओ आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) उत्तर प्रदेश युनिटकडून ट्विट करण्यात आला आहे. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत 250 पैकी 134 जागा जिंकून भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. तर भाजपला 104 जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला केवळ 9 जागांवर विजय मिळवण्यात यश आले.
हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…