अबब! रात्रीच्या अंधारात १ हजार किमी चा समुद्र प्रवास करुन ते चेन्नईतून ओडिशाला आले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. नुकतेच सरकारने या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्पयाची घोषणा केली आहे.या टप्प्यातील लॉकडाऊन संपायलाही अजून १० दिवसांची अवधी बाकी आहे. मात्र तरीही मजुरांमध्ये असलेली या लॉकडाऊन बद्दलची भीती काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे.अशीच एक घटना चेन्नईमध्ये समोर आली आहे ज्यामध्ये दोन डझनहून अधिक मच्छीमार हे रात्रीच्या अंधारात पाण्यातून आपल्या नावेत हजारो किलोमीटरचा प्रवास करून आंध्रप्रदेश आणि ओरिसास्थीत आपल्या गावात पोहोचले आहेतपहिल्या टप्प्यातील लॉक डाऊनमुळे जवळपास महिनाभर चेन्नईतच अडकलेल्या या मच्छीमारांनी एक नाव विकत घेतली आणि रात्रीच्या अंधारात जीव मुठीत घेऊन समुद्राच्या पाण्यातून हजारो मैलांचा प्रवास केला.

या टीम मध्ये एकूण २७ मच्छीमार होते जे चेन्नई मध्ये माश्यांचा व्यापार करत होते. अचानक एका दिवशी हे सगळे त्या व्यापारी केंद्रातून गायब झाले आणि २० एप्रिल रोजी पाच दिवसांनंतर आंध्रा-ओडिशाच्या सीमेवर असलेल्या इच्चपूरम तट इथे पोहोचले.परंतु तिथे पोहोचल्या वर तिकडच्या पोलिसांनी त्यांना पकडून क्वारंटाईन केंद्रावर पाठवून दिले.

ओडिशाच्या गंजाम जिल्ह्याचे कलेक्टर विजय अमृता कुलंगे यांनी या लोकांच्या समुद्री प्रवासाची पुष्टी दिली आहे ते म्हणाले कि,” हे १७ मच्छीमार सोमवारी सकाळी एका लाकडी नावेतून येत होते ते आंध्रा-ओडिशा सीमेवर आंध्रा इच्छापूरम येथील दानकुरू समुद्रतट इथे पोहोचले. त्यातील दहा जण हे ओडिशाचे तर बाकीचे सगळे हे आंध्रातील रहिवासी आहेत.

त्या मच्छीमारांना विचारण्यात आले कि रात्रीच्या अंधारात समुद्रातून नावेमधून येणे रोमांचित होते का ? याला उत्तर देताना ते म्हणाले कि,” चेन्नई मध्ये दररोज कोरोना व्हायरसच्या बातम्या ऐकून आम्हाला भीती वाटत होती.आम्हाला घरी परत यायचे होते. पण आमच्याकडे काही साधन नव्हते,तेव्हा आम्ही आपसात चर्चा केली आणि एक नाव विकत घ्यायचे ठरवले. जेणेकरून समुद्रमार्गे आपल्याला घरी जात येईल. मच्छीमारांनी सांगितले कि नांव खरेदी करण्यासाठी प्रत्येकाने ७ हजार रुपये दिलेत.अशाप्रकारे त्यांनी १.७३ लाखांमध्ये नाव खरेदी केली.हि नाव तीन वर्ष जुनी आहे आणि त्याला ९HP हे इंजिन जोडलेले आहे.या नावेच्या मालकाला आम्ही विश्वासात घेतले आणि तेव्हाच त्याने हि नाव आम्हाला दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.