हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या एका अजगरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.ज्यामध्ये त्याने एका हरणाला अतिशय निर्दयतेने गिळंकृत केले आहे.हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील दुधवा नॅशनल पार्कमधील आहे. हा व्हिडिओ मागील वर्षातील आहे,पण आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी नुकताच दोन दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा तो व्हायरल झाला.
नॅशनल जिओग्राफिकच्या मते,बर्मीज अजगर पृथ्वीवरील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे.ते त्यांच्या शिकारीला तोपर्यंत सोडत नाहीत जोपर्यंत त्यांचा गुदमरुन जीव जात नाही.त्यांच्या जबड्यांचा आकार असतो की ते अगदी सहजपणे त्यांची शिकार पूर्णपणे गिळून टाकु शकतील.
कसवान यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की या बर्मीज अजगराने एक हरिण कसे पकडले आहे आणि ते गिळत आहे. दुधवा नॅशनल पार्कमध्ये मागील वर्षी हा व्हिडिओ वाईडलेन्स इंडियाने शूट केला होता.
Unbelievable !! This Burmese python was too much hungry so swallows whole deer. From Dudhwa sent by @WildLense_India for sharing. pic.twitter.com/QdCBXEy4vZ
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 28, 2020
कसवान यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ते दृश्य अविश्वसनीय आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यापासून २२,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेलेला आहे.युझर्सनी बर्याच कमेंट तसेच प्रश्नेही विचारली आहेत.
एका युझरने विचारले होते की ते अजगराचे शिंग कसे काढू शकतो, ज्याला वाइल्डलेनने उत्तर दिले,अजगर शिंगेही पचविण्यास सक्षम असतात आणि ते बर्याचदा हरिणांची शिकार करतात.
गेल्या वर्षी गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील एका घराच्या मागील अंगणात नऊ फूट लांबीच्या अजगराने एक मांजराला गिळले होते आणि नंतर तिला बाहेरही काढले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.