Jioचे अच्छे दिन! अमेरिकेतील ‘सिल्वर लेक’ कंपनीची तब्बल 5 हजार 656 कोटींची गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दोनच आठवड्यांपूर्वी जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यानंतर आता रिलायन्स ग्रुपचे सेर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी अजून एका कराराची घोषणा केली आहे. हा करार जिओ प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक यांच्यात झाला आहे. करारानुसार तब्बल 5 हजार 656 कोटी रुपयांची गुंतवणूक सिल्वर लेक कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून आज याबाबत माहिती देण्यात आली.

सिल्वर लेक फर्मची जगातील मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत भागीदारीचा शानदार रेकॉर्ड राहिलाय. टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे. सिल्वर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत ग्लोबल लीडर आहे. यापूर्वी सिल्वर लेकने अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल , अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यांसारख्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. कमालीची बाब म्हणजे केवळ १ टक्के हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकने जिओमध्ये तब्बल 5 हजार 656 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीये. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू 4.90 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.15 लाख कोटी झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment