शरद पवार साहेबांनी पाठिंबा दिला तर मी…; राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया

Abhijeet Bichukale Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहरेत. दरम्यानही निवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. दरम्यान आता कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मी राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरतोय, तुम्ही सही कराल का? अशी विचारणा शरद पवार साहेबांकडे करणार असल्याचे बिचुकले म्हणाले.

अभिजित बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिचुकले म्हणाले कि, मी राष्ट्रपती पदासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 100 आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी आपण चाचपणी करत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला तर आपले काम सोपे होईल. काही जवळच्या आमदारांसोबत माझे बोलणे सुरू आहे. मी राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरतोय, तुम्ही सही कराल का? अशी विचारणा मी त्यांच्याकडे करत आहे.

गेल्यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मला राष्ट्रपती करा अशी मागणी केली होती. मी बहुजन समाजातील आहे. हुशार आहे. यामध्ये माझा काहीच स्वार्थ नाही. पण महाराष्ट्रातला एक पुरुष पहिल्यांदा राष्ट्रपती बनेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं शिवसेनेशी युती करून जसे महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्याप्रमाणे जर शक्य असेल तर महाराष्ट्रातील एक लढवय्या या नात्याने पवार साहेबांनी मला पाठिंबा द्यायचे ठरवले तर माझे काम एकदम सोपे होईल. 288 आमदारांपैकी 100 सह्या मला सहज मिळून जातील, असे बिचुकले यांनी म्हंटले.