हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कावरील भाषणातून मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. मशिदीवर भोंगे का? असा सवाल केला. तसेच त्यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला. यावरून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?, असा सवाल आझमी यांनी विचारला आहे.
अबू आझमी यांनी साधला. राज ठाकरे यांच्या भोंग्याविषयीच्या भूमिकेवरून निशाणा साधला. यावेळी आझमी म्हणाले की, मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का? आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही,
राज ठाकरे म्हणतात कि मशिदीपुढे भोंगे हनुमान चाळीसा लावा. एवढेच सांगतो की, मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ. धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कावरील भाषणातून मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. मशिदीवर भोंगे का? असा सवाल केला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवले तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. धर्म निर्माण झाला तेव्हा भोंगे होते का? असा सवाल त्यांनी केला होता. मी कोणत्याही प्रार्थनेविरोधात नाही. तुम्ही तुमची प्रार्थना जरूर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको. युरोपात तरी कुठे भोंगे आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.