औरंगाबाद-जालना रोडवर बस आणि जीपचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – औरंगाबाद- जालना महामार्गावर गाढे जवळगाव फाट्यावर बस-जीपच्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

जालन्याकडून औरंगाबादेकडे येणारी कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढे जवळगाव फाट्यावर सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की जीपचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. जीप रस्ता दुभाजकावर आडवी झाली. यात पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच मृतांची संख्या आणखी वाढू शकते असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे.

 

माहिती मिळताच करमाड पोलिसांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक प्रभावित झाली आहे. पोलीसांचे वाहतूक सुरळीत करण्याची प्रयत्न सुरु आहेत.