हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. दिवा आगासन रोडवर रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. गणेश पाले असे या रस्ते अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
खड्ड्यामुळे तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/AMtcT0BpEj
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 29, 2022
काय घडले नेमके ???
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, दोन बाईक, एक रिक्षा आणि एक व्यक्ती पायी चालताना दिसत आहे. तर समोरच्या बाजूने एक टँकर येताना दिसत आहे. एका स्कूटीवर जात असलेला तरुण खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करतो. पण एका खड्ड्यात तरुणाची स्कूटी आदळते आणि त्याचा स्कूटीवरील तोल जातो. यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या तरुणाच्या शरीरवरुन समोरचा टँकर धडधडत जातो. भलामोठा टँकर शरीरावरुन गेल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू (accident) झाला आहे.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
या अपघातानंतर (accident) पालिका प्रशासन, सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्यावर आरोप केला जातोय. युवकाच्या अपघाती मृत्यूला तेच जबाबदार असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे या सगळ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांच्याकडून करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!
PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या
ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा