Monday, February 6, 2023

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली. आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. त्यासाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

मेटे यांच्या अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नसल्याने मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर आहे.

- Advertisement -

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातात मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.

पहाटेच्यावेळी घडलेल्या अपघाताच्या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. या अपघातात विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा झाला होता. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्यांच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठे रक्त लागल्याचेही दिसून आले होते. तसेच शर्टावरही रक्ताचे डाग लागले होते.