Monday, February 6, 2023

‘प्रिय भक्तSSs’.. अभिनेता प्रकाश राज यांची मोदी समर्थकांना शाल जोडीतील चपराक

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीत गाजलेले नाव आणि आता बॉलिवूड अभिनेता असलेले प्रकाश राज नेहमीच मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत असतात. त्यामुळे अनेक वेळा मोदी सर्मथकांकडून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येते. मात्र ते अश्या ट्रोल करणाऱ्या मोदी समर्थकांकडे दुर्लक्ष करीत मोदींविरुद्ध सातत्याने आवाज उठवत राहतात. कधी तिखट, कधी कडू तर कधी सबसे बत्तर अश्या भाषेत रोकठोक ते आपले मत परखडपणे मांडत असतात. मात्र यावेळी प्रकाश राज यांनी मोदी समर्थकांना अगदी शाल जोडीतील लगावून दिली आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी अगदी प्रेमळ शब्दात मोदी समर्थकांना चांगलेच उत्तर दिले आहे. मुद्दा असा कि, गेल्या काळात गाझियाबादमधील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी सोशल मीडियावर अनेक मीडिया युजर्सने ट्विट केले आहे. कठुआ मंदिरातील गँगरेप आणि गाझियाबाद येथील मशिदीतील बलात्कार या दोन्ही घटना अगदी समान आहेत. अशी चर्चाही सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सोशल मीडियावर अनेक लोकांकडून केली जात आहे. मात्र काही युजर्स आरोपीच्या समर्थनार्थ असून ते मोर्चे काढत आहे. मग अश्या या समर्थकांचा समाचार घेणार तरी कसा..? मग सोशल मीडियाहुन अधिक योग्य मार्ग तरी कोणता असणार.. म्हणून #JustAsking या हॅशटॅगने तोंड वर काढले आहे. याच हॅशटॅगच्या अंतर्गत अनेकजण या समर्थकांना चांगलेच झोडपून काढत आहेत.

मात्र या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर जी वादग्रस्त विधानांसाठी आणि आपल्या परखड व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते, तिने JustAsking हा हॅशटॅग वापरत भारत माता की जय म्हणणारे या विरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल केला. यावर आता तिच्या ट्विटला रिट्विट करत पाठिंबा देणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अनेकांनी या मुद्द्यावरूनही तिला ट्रोल केले आहे. मात्र यावेळी गप्प न बसता प्रकाश राज यांनी प्रत्युत्तर दिले आहे आणि तेही चांगलेच तिखट. ‘प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारत आहे, जे आज सत्तेत आहेत. मी सत्तेत नाही… असे ट्विट राज यांनी केल.’ भले या ट्विटमध्ये त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण याचे टोक कुणाच्या दिशेने आहे हे अगदीच स्पष्ट आहे.