‘या’ कारणामुळे आदित्य नारायणची Indian Idol मधून एक्झिट ; ‘हा’ अभिनेता करणार सूत्रसंचालन

मुंबई : टीव्ही रिऍलिटी शो इंडियन आयडल मधील सूत्रसंचालक आणि सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आता या शोमध्ये दिसणार नाहीये. आपल्या अनोख्या शैलीने मुळे उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून आदित्य चांगलाच प्रसिद्ध आहे. मात्र आता आदित्य ने हा रियालिटी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या कारणामुळे आदित्यची एक्झिट

गेल्या काही काळापासून आदित्य आजारी आहे शूटिंगच्या ताणामुळे त्याला अशक्तपणा जाणवतो आहे. शिवाय डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आदित्यने कामातून ब्रेक घेण्यासाठी इंडियन आयडल हा शो सोडायचा निर्णय घेतला आहे. आता आदित्यच्या जागी अभिनेता जय भानुशाली इंडियन आयडल या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. जय भानुषालीने देखील अनेक रियालिटी शोचे होस्टींग केले आहे.

दरम्यान आदित्यच्या हटके अंदाजामुळे इंडियन आयडल च्या सेट वरील स्पर्धक, पाहुणे, प्रेक्षक आणि परीक्षकांचे उत्तम मनोरंजन होत असे. आदित्यच्या एक्झिटमुळे त्याच्या फॅन्समध्ये नाराजी आहे.

You might also like