हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गेली 102 दिवस अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राऊतांच्या जामीन मंजुरीनंतर शिवसेनेकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘राऊत यांना जामीन मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. आता आमची तोफ आता पुन्हा रणांगणात आली आहे. राऊत साहेब हे निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच शिवाय ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले.
संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत हे खरे शिवसैनिक आहेत. ते उगाच कुणाचेही नाव लावून, मुकुट लावून फिरत नाहीत. राऊत यांच्यावरही दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र, ते पळून गेले नाहीत, त्यांनी गद्दारी केली नाही हे लोकांसमोर आलेले आहे.
मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत दोघेही न्यायालयीन कोठडीत होते. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी निकाल देण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटावर टीका
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी राऊत यांचे कौतुक करत शिंदे गटातील आमदारावर टीका केली. ठाकरे म्हणाले, राऊत हे एक निष्टावंत होते ते गद्दार नव्हते, अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
संजय राऊतांवर आरोप काय?
सध्या अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप करत 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.