डॉक्टर, पोलीसांना निशुल्क सेवा देणाऱ्या ‘त्या’ रिक्षा चालकाला आदित्य ठाकरेंनी पाठवली खास भेट

Aditya Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोरोनामुळे सध्या लॉक डाऊन सुरु आहे. लोकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली आहे. सोबतच वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आपातकालीन काळात सामान्य नागरिकांना रुग्नालयात जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध होता नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र डोंबिवली मधील एक रिक्षाचालक अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून देत आहे. आणि याची माहिती कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे याना माहिती पडताच त्यांनी न विसरता या रिक्षाचालकाचे आभार मानले आहे.

विशेष म्हणजे आदित्य ठाकरे याना या रिक्षाचालकाच्या कार्याची माहिती मिळाली. त्यांनी या रिक्षाचालकाचे आभार व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी वरून सरदेसाई याना शोधण्याचे आदेश दिले. आणि लागलीच शिवसैनिकांनी त्या रिक्षाचालकाला शोधून काढले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षाचालकाला मास्क आणि सॅनिटायझर देऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच खुद्द आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

माणुसकी धर्म पाळणारे रुपेश जी, यांच्या सोबत देखील आज संपर्क साधला. परवा मी ट्विटरच्या माध्यमातून पाहिले होते की ते आपल्या रिक्षामधून डॉक्टर्स, पोलिस आणि रुग्णांना निःशुल्क सेवा पुरवतात. त्यांचे आभार मानले. हीच ताकद आपल्याला ह्या व्हायरसला हरवण्यात उपयोगी येत आहे. असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in