“दिल्लीच्या तख्त्यावर 2024 मध्ये शिवसेना बसणारच”; आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या केंद्र सरकारवर महात्राष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून निशाणा साधला जात आहे. कारण भाजप केंद्र सरकारकडून तपास यंत्रणेचा वापर करून आघाडीतील नेत्यांवर कारवाई करत आहे. दरम्यान यावरून शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आगामी 2024 मध्ये सत्तेच्या दृष्टीने महत्वाचे विधान केले आहे. ” 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

आज आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नुकताच उत्तर प्रदेशातील दौरा केला. या ठिकाणी मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही म्हंटले.सध्या केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024 ला शिवसेना तिथे बसेल आणि सगले थांबेल. दिल्लीत सत्तेत बसल्यावर शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल.

सध्या केंद्रीय एजन्सीकडून केले जात असलेले जे काम आहे, ते केवळ प्रचारासाठीच सुरू आहे. कोणतेही राज्य अशा प्रकारच्या एजन्सीला घाबरणार नाही, झुकणार नाही. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल. राज्यातील नानक पक्ष नाटकी करतात, आपण परखडपणे बोलतो. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही आणि आजही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.