मुंबई प्रतिनिधी | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढणार अशा चर्चा सध्या शिवसेनेच्या गोटात रंगत आहे. आदित्य ठाकरे यांना उमेदवारीसाठी वरळी आणि शिवडी मतदारसंघाची चाचपणी देखील सध्या सुरु आहे. त्या दृष्टीनेच शिवसेनेने सचिन अहिर यांना आपल्यात सामावून घेतले आहे. आदित्य ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिवसेनेत येण्याचा आदित्य ठाकरे यांच्याच उमेदवारीला फायदा होईल असे बोलले जाते आहे.
छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात
वरळी विधानसभा मतदारसंघातून गतवेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता सचिन अहिर शिवसेनेत आल्याने वरळीत सुनील शिंदे कि सचिन अहिर हा प्रश्न शिवसेनेत रंगात आला आहे. मात्र या जागीच आदित्य ठाकरे उभा राहण्याची शक्यता अधिक आहे. तर सचिन अहिर यांना शिवसेना भायखळा मतदारसंघातून लढवू इच्छित आहे असे देखील सूत्रांनी सांगितले आहे. मात्र स्वतः सचिन अहिर भायखळ्यातून लढणार हा प्रश्न देखील महत्वाचा आहे असे सध्या दिसते आहे.
रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात
दरम्यान आपण आणि सचिन अहिर फोन आणि मेसेजच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यांना महाराष्ट्रासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना आम्ही आमच्या सोबत घेतले आहे. मीच त्यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे आदित्य ठाकरे यांनी एका ठिकाणी सांगितले होते. एकंदरच आगामी काळात सचिन अहिर यांचे मातोश्रीवर वजन वाढणार हे निश्चित आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसकडून या तरुण नेत्याला उमेदवारी?
खूप लढलो पण? ; सी.सी.डिचे मालक सिद्धार्थ यांनी कामगारांना लिहले पत्र