नवी दिल्ली । दिग्गज आयटी कंपनी Google ला मोठा झटका बसला आहे., देशातील अँटी-ट्रस्ट रेग्युलेटर भारतीय स्पर्धा आयोग (CCI) ने शुक्रवारी बाजारात वर्चस्वाचा गैरवापर केल्याप्रकरणी Google विरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.
CCI ने म्हटले आहे की, “सुव्यवस्थित लोकशाहीमध्ये न्यूज मीडियाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर जास्त जोर दिला जाऊ शकत नाही आणि डिजिटल कंपनीने सर्व भागधारकांमध्ये उत्पन्नाचे योग्य वितरण ठरवण्याच्या स्पर्धात्मक प्रक्रियेला हानी पोहोचवू नये. तसेच यासाठी आपल्या मजबूत स्थितीचा गैरवापर करू नये.”
स्पर्धा कायद्याच्या कलम 4 मधील तरतुदींचे उल्लंघन
CCI ने एका आदेशात म्हटले गेले आहे की, Google ने स्पर्धा कायदा, 2002 च्या कलम 4 च्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे जे बाजारातील मजबूत स्थानाच्या गैरवापराशी संबंधित आहे.
DNPA ने तक्रार केली होती
डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (DNPA) ने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा आदेश देण्यात आला आहे. यामध्ये अल्फाबेट इंक., गुगल एलएलसी, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती.
नुकतेच CCI ने Apple च्या विरोधात चौकशीचे आदेश दिले
अलीकडेच, CCI ने कथित अनुचित व्यावसायिक क्रियाकार्यक्रमांसाठी अमेरिकन टेक कंपनी Apple विरुद्ध चौकशीचे आदेश दिले. Apple वर थर्ड पार्टी डेव्हलपर्सशी स्पर्धा करणाऱ्या अॅप्सचे मालक बनून आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.