प्रेयसीची छेड काढल्याने 45 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या

murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना आहे. 20 मे रोजी जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर एका 45 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. यानंतर 17 दिवसांनी पोलिसांना या प्रकरणाची उकल करण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मिस्त्रीकाम करणाऱ्या 23 वर्षीय सुनील जयसिंग निभोंरे याला अटक केली आहे. आपल्या प्रेयसीची छेड काढल्यामुळे आपण हि हत्या केल्याचे आरोपी सुनीलने कबुल केले आहे.

काय आहे प्रकरण
मृत 45 वर्षीय दादाराव सांडू सोनवणे यांचा मृतदेह 21 मे रोजी जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर आढळला होता. त्यानंतर मृताची ओळख पटवण्यात आली. यानंतर मृत दादाराव सांडू सोनवणे यांची हत्या कोणी केली ? हा प्रश्न पोलिसांसमोर होता. पण सिडको पोलिसांनी 17 दिवसांत या प्रकरणाची उकल केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. या पथकाने केलेल्या चौकशीत आरोपी सुनील हा आपल्या 25 वर्षीय प्रेयसीला घेऊन याठिकाणी येतो अशी माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी आरोपी सुनीलला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे.

आरोपी सुनिलचे एका 25 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो नेहमी आपल्या प्रेयसीला जाधववाडी येथील व्यापारी संकुलाच्या छतावर घेऊन जायचा. 20 मेच्या रात्रीदेखील आरोपी सुनील आपल्या प्रेयसीला याच ठिकाणी घेऊन गेला होता. पण यावेळी मृत दादाराव अगोदरपासून त्या छतावर होते. त्यांना पाहून सुनीलचा थोडा हिरमोड झाला पण तरीदेखील तो प्रेयसीसोबत तिथेच बसला. त्यानंतर आरोपी सुनील लघुशंकेसाठी गेला असता मृत दादारावने सुनीलच्या प्रेयसीची छेड काढली. यानंतर सुनीलने रागाच्या भरात सिमेंटच्या गट्टूने दादाराव यांच्या डोक्यात वार करत त्यांची हत्या केली. यानंतर आरोपी सुनील आपल्या प्रेयसीला घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता.