हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या असताना मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत महत्वाचे विधान केले आहे. “इंदु मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने म्युझियम उभ करण्यात यावं यासाठी मागणी केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी इंदू मिलमध्ये पुतळा बसवण्याचे फ्याड आणलं, असे आंबेडकर यांनी म्हंटले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासोबत म्युझियम देखील उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. काँग्रसवाल्यांनी आम्हाल चेचायचं तेवढं चोपल. मात्र, आम्ही कधीही भाजप सोबत जाण्याचा विचार केला नाही.
आम्ही सेनेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली होती. मात्र, त्यांच्या समोर एक अट ठेवली होती की, तुम्ही भाजपची साथ सोडा परंतु सेना त्यावेळी साथ सोडायला तयार नव्हती, असे आंबेडकरांनी सांगितले. मात्र, आता युतीचा बॉल उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे. त्यामुळे आजूनही ठाकरे-आंबेडकर ऐकत्र येतील की नाही हे अजून तरी स्पष्ट झाले नाही. परंतु आंबेडकरांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.