पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सीएएला घाबरू नका!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात किमान सव्वा तास चर्चा झाली. या चर्चेननंतर मुख्यमंत्री ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवास्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यासोबतच पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सीएए, एनपीर आणि एनआरसीवर चर्चा झाली. सीएए हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे या कायद्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे सांगितलं आहे.सीएएद्वारे शेजारील देशात अल्पसंख्यांक असलेल्यांना नागरिकत्व देण्यात येतं. सीएएने कुणाचं नागरिकत्व काढण्यात येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. एनपीआरमध्ये काही गडबड असले तर त्यावेळी निर्णय घेऊ. तसंच एनआरसी हे देशभारत लागू करण्यात नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment