हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडी मध्ये विस्फोट झाला. शंभर कोटींच्या वसुली प्रकरणामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता मात्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिले या पत्रात त्यांनी परमवीर सिंग यांच्या चौकशी करण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमवीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र आता त्यांनी पत्राद्वारे चौकशीस नकार दिला आहे.
परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात संजय पांडे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अनिल देशमुख यांच्या वरील शंभर कोटी वसुली प्रकरणात आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता संजय पांडे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशी करण्यास नकार दिला आहे. दरम्यान परमबीर सिंग यांच्या याचिकेवर पाच मे रोजी सुनावणी होणार आहे. पण त्या आधीच त्यांनी पत्र लिहून परमवीर सिंग यांची चौकशी करण्यास नकार दर्शवला आहे.
परमवीर सिंग यांच्या प्रकरणी पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी तक्रार केली होती. तर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमवीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. डांगे यांनी परमविर सिंह यांच्या अंडरवर्ल्ड सोबत संबंध आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 2019 मध्ये डांगे यांनी एक धाड टाकली होती. तेव्हा तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने पब मालकाने डांगे यांना धमकी दिली होती. त्यानंतर डांगे यांना खातेनिहाय चौकशी करून निलंबित करण्यात आलं होतं. पुनर्नियुक्ती करण्यासाठी डांगे कडून परंबिर सिंग यांच्या खास माणसाने दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.