नवी दिल्ली । पूर्व लद्दाखच्या गॅलवान व्हॅली आणि भारत-चीन सैनिकांमधील तणावग्रस्त संघर्षानंतर मंगळवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) शांघाय कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशनच्या (SCO summit) व्हर्चुअल बैठकीत सहभाग घेतील. मे महिन्यात पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर तणाव सुरू झाल्यानंतर प्रथमच हे दोन नेते आमने-सामने असतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानदेखील उपस्थित असतील.
मीडिया रिपोर्टनुसार मोदी या महिन्यात सहा परिषदांमध्ये भाग घेणार आहेत. एससीओ परिषदेनंतर नोव्हेंबरच्या मध्यात मोदी व्हिएतनामने आयोजित केलेल्या पूर्व आशिया आणि आसियान परिषदेत भाग घेतील. 17 नोव्हेंबरला मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ब्रिक्स परिषदेत उपस्थित राहतील आणि त्यानंतर ते 21-22 नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या वतीने आयोजित G -10 परिषदेत भाग घेतील. महिन्याच्या अखेरीस, 30 नोव्हेंबर रोजी शांघाय सहयोग संस्था सदस्य देशांचे अध्यक्ष मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत भाग घेईल.
मोदी-जिनपिंग 18 वेळा भेटले आहेत
मोदी आणि शी जिनपिंग हे दोघे गेल्या सहा वर्षांत 18 वेळा भेटले आहेत. सौदी अरेबियाने आयोजित केलेल्या G -20 परिषदेत या दोघांची शेवटची भेट झाली होती. तज्ञांच्या मते चीनच्या आक्रमक वृत्तीद्वारे या परिषदांच्या माध्यमातून भारताला जगाच्या पुरवठा साखळीत एक महत्त्वाचा सदस्य म्हणून स्वतःला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या सर्व परिषदा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन घेण्यात येतील. सीमेवरील तणावाबाबत हे दोन्ही देश कठोर भूमिका घेत आहेत आणि अशा परिस्थितीत या दोन्ही नेत्यांमध्ये सीमेबाबत काही बोलण्याची शक्यता फारच कमी आहे.
सामान्यत: आयोजित परिषदांमध्ये नेते परिषदेपासून स्वतंत्रपणे भेटतात आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, पण व्हर्चुअल बैठकीत ही शक्यता जवळजवळ शून्यच आहे. 2017 मध्ये तीन महिने चाललेला डोकलाम वादाचा निपटारा सप्टेंबर 2017 मध्ये झियामेन येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेपूर्वी झाला होता. चीनचे अध्यक्ष अहमदाबादला जात असताना 2014 चा चुमार सीमा विवादही मिटला होता. या दरम्यान मोदी त्यांच्याशी बोलले. यावेळी लष्करी कमांडर यांच्यात चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत, डिप्लोमॅट्समध्ये सहा फेऱ्या झाल्या आहेत. तसेच संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री यांच्यात समोरासमोर चर्चा झाली आहे, परंतु आतापर्यंत डिसइन्गेजमेंट आणि डीएस्केलेशनची चिन्हे दिसलेली नाहीत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.