हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुण आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न आपल्यातील प्रत्येकजणच करत असतो. त्यासाठी आजकाल बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने देखील उपलब्ध झाली आहेत. अनेक महिला तर आजकाल ऑपरेशन्स देखील करून घेत आहेत. मात्र, असे असले तरीही वाढत्या वयानुसार सौंदर्यही संपुष्टात येते हे लक्षात घ्यायला हवे. मात्र एक असा देश आहे, जेथील महिला आपल्या वयाच्या 90 वर्षीही तरुण दिसतात. होय हे अगदी खरे आहे.
तर आपला शेजारील देश असलेल्या पाकिस्तानच्या हुंजा खोऱ्यातील महिला जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानल्या जातात. इतकंच नाही तर इथल्या महिला वयाच्या 60 ते 90 व्या वर्षीही बाळाला जन्म देतात, असेही म्हंटले जाते. चला तर त्याविषयीची माहिती जाणून घेउयात…
हे लक्षात घ्या कि, हा परिसर जितका सुंदर आहे तितकाच तो निरोगी देखील आहे. या भागातील लोकांचे सरासरी आयुष्य हे 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. याशिवाय इथली लोकं ही फार क्वचितच आजारी पडतात. हुंजा खोऱ्यातील लोकांच्या राहणीमानामुळे ते म्हातारपणातही अगदी तरुण दिसतात. अतिशय साधे जीवन जगणारी ही लोकं रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठतात आणि रात्री लवकर झोपतात. शारीरिकदृष्ट्या या समाजातील लोकं खूप मजबूत देखील आहेत. इथले पुरुष वयाच्या 80 व्या वर्षीही वडील बनू शकतात तर इथल्या महिला वयाच्या 90 व्या वर्षीही माता होऊ शकतात.
काही शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केले असता त्यांना आढळून आले कि, हुंझा खोऱ्यातील वितळणाऱ्या हिमनदीतून येणाऱ्या पाण्यात भरपूर खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे ही लोकं नैसर्गिकरित्या निरोगी राहतात. अनेक लेखकांकडून या लोकांबाबत पुस्तके देखील लिहिली गेली आहेत. यापैकी Dr. Joe Clark चे ‘The Lost Kingdom of the Himalayas’ आणि JI Rodal चे ‘The Healthy Hunzas’ ही सर्वात फेमस पुस्तके आहेत.
येथील महिलांचे सौन्दर्य हे चिरतरुण आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. या महिला आपल्या वयाच्या अगदी 60-70 वर्षी देखील विशीतल्या तरुणींसारख्या दिसतात. या समाजातील लोकांना बुरुशो या नावाने देखील ओळखले जाते. हि लोकं बुरुशास्की भाषा बोलतात. धर्माने मुस्लिम असलेल्या या समजतील लोकं ही इतर कुठल्याही समाजापेक्षा जास्त शिक्षित मानले जातात.
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर